बालेवाडी :
बालेवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेच्या शुभप्रसंगी “गाते रहो, बजाते रहो..!” हा संगीतसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री. बाबुराव आप्पा चांदेरे (मा. स्थायी समिती अध्यक्ष, पुणे मनपा), मा. श्री. राहुल दादा बालवडकर (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे) आणि सौ. ज्योती राहुल बालवडकर (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या सौजन्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन माझ्या जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी येथे करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी सुप्रसिद्ध गायक चैतन्य गायक कट्टा यांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी व मराठी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
संगीतमय वातावरणात परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि “यांच्या सौजन्याने गाते रहो, बजाते रहो…” या संकल्पनेला अनुसरून गीतांचा मनसोक्त आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक दूध वितरण करण्यात आले व सर्वांनी एकमेकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप आनंदोत्सवात केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी