माढा (जि. सोलापूर):
अलीकडील अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती मुळे बाधित झाल्याने अडचणीत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील महाळुंगे (ता. मुळशी ) गावकऱ्यांनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे.
महाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवडगाव येथील शेतकऱ्यांना २०० अन्नधान्य किट सुपूर्द करण्यात आले. ही मदत केवडगावाचे सरपंच श्री. राजेंद्र पाटील आणि उदरगावाचे सरपंच श्री. अतुल म्हस्के यांच्या मार्फत गावातील शेतकरी बांधवांना देण्यात आली.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला असून महाळुंगे ग्रामस्थांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी एकत्र यायला हवे,” असा संदेश या उपक्रमातून दिला गेला.



More Stories
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*