पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर-महाविद्यालयीन वॉटर पोलो स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या ६ खेळाडूंची निवड आंतरविभागीय वॉटर पोलो स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच मुलींच्या गटातही घोलप महाविद्यालयाने बाजी मारत स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकली असून, ५ मुली व ४ मुले यांची निवड आंतरविभागीय स्विमिंग स्पर्धेसाठी झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माननीय उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार श्री. मोहनराव देशमुख, सहसचिव श्री. एल. एम. पवार, प्रशासन सचिव श्री. ए. एम. जाधव, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे व शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांनी विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहनपर संदेश दिला.
महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचा गौरव करत त्यांना पुढील स्पर्धांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी