महाळुंगे :
महाळुंगे गावातील व परिसरातील नागरी, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी जयेश मुरकुटे यांच्या वतीने भव्य ‘आक्रोश निषेध आंदोलन’ करण्यात आले.
यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या दहा वर्षापासून ‘हायटेक सिटी’च्या नावाखाली नागरिकांना रस्ते, पाणी, ट्रॅफिक, कचरा या मूलभूत सुविधा न मिळाल्या बद्दल या परिसरातील नागरिकांची तीव्र नाराजी होती. येथील शेतकऱ्यांना स्वतःची मालकीची जमीन असूनही त्यांना ती विकसित करता येत नाही, ना विकता येत आहे.
पुणे महानगरपालिका आणि PMRDA यांच्यात या हायटेक सिटी बद्दलची जबाबदारी विभागली गेली नाहीये. त्यामुळे येथील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, पिण्याच्या पाण्याचा अजूनही प्रलंबित आहे. कचरा व्यवस्थापनाचा अभाव; स्थानिक पातळीवर कचराकुंड्यांची आणि नियमित उचलण्याची व्यवस्था नाही. वाहतूककोंडी, सुरक्षिततेचा अभाव, अपघातांच्या घटना व वाढलेले प्रदूषण. पीएमसी, पीडब्ल्यूडी आदी शासन विभागांच्या कामकाजात समन्वय नाही. नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या गोष्टींचे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 3बोगस NOC, अनधिकृत विकास, ई-रिक्शा व बस सेवेचा विषय प्रलंबित.शाळा, आरोग्य सुविधा, बगीचे, पथदिवे या आवश्यकता आजही अपूर्ण आहेत. स्थानिकांना कोणतेही औद्योगिक, व्यावसायिक रोजगारी संधी उपलब्ध नाहीत.नवीन घर मालकांसाठी सवलतींचा अभाव आणि नोटीसांचा त्रास होत आहे.
या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर जयेश मुरकुटे यांच्या पुढाकाराने आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी VTP अल्पाइन चौक तसेच गोदरेज हिलसाईड 1 सोसायटी समोर, याठिकाणी येथील शेकडो स्थानिक नागरिक, शेतकरी आणि मालमत्ताधारक या आक्रोश आंदोलनासाठी उपस्थित होते.
यावेळी पोलिस पाटील शांताराम पडाळे, माजी सरपंच नामदेव गोलांडे, सोपानराव पडाळे, लक्ष्मण पडाळे पाटील, बापूसाहेब पडाळे, अंकुश दादा पडाळे, ॲड. श्रीकांत दळवी, मयुर भांडे, नितीन पायगुडे, रणजीत पडाळे पाटील, सागर चिव्हे, तुषार हगवणे, रितेश पडाळे, रितेश निकाळजे, संदीप बालवडकर, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, ज्योती चांदेरे, हर्षदा थिटे, प्रमिला मुरकुटे, प्रियांका सिंग, आशिष बापट, अमित कुटे, राहुल कदम, संदीप तनपुरे, शुभम सिंग, प्रशांत कुमार, हरिनयन पटेल यांच्यासह कुल इकोलॉक, VTP अल्पाईन, VTP Leonara, VTP Belair, गोदरेज हिलसाइड 1, गोदरेज हिलसाइड 2, गोदरेज Greencove, Riveria या सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले