सोमेश्वरवाडी :
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने आणि माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या विशेष प्रयत्नातून कृष्णा नगर, सोमेश्वरवाडी येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण कामामुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेल्या ड्रेनेज समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. शुभारंभानंतर प्रमोद निम्हण यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
माजी नगरसेवक प्रमोद निम्हण म्हणाले, “प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हा माझा कायमस्वरूपी प्रयत्न राहील. जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे.”



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी