May 12, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेरकरांनी अयोध्येतील श्री राम लल्ला पूजा अक्षता कलशचे केले जल्लोषात स्वागत..

बाणेर :

बाणेर येथे अयोध्येतील राम लल्लाच्या गर्भगृहात मंत्र उच्चाराने पवित्र केलेल्या अक्षदा कलशाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. वातावरण जल्लोष असा होता की, सगळ्यांना आता वेध लागले ते श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळाचे.

 

बाणेर येथिल ग्रीन पार्क हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पर्यंत  प्रथम बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर शिवस्मारकापासून भव्य स्वरूपात बाणेर गावातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्र आणि ग्रामस्थ यांनी अक्षता कलशाचे स्वागत मोठया जल्लोषात केले.

फुगड्यांचे फेरे घेत, डोलताशांचा गजर, इस्कॉन चे वाद्य निनाद आणि राम नामाचा गजर करत संपूर्ण बाणेर गाव भक्तिमय वातावरणात न्हाहुन निघाले.