September 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथिल तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियान आयोजित ‘वसुंधरा चित्रकला स्पर्धा २०२३’ मध्ये मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवला चित्रकलेचा आनंद..

बाणेर :

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वसुंधरा अभियान यांच्या वतीने ‘वसुंधरा चित्रकला स्पर्धा २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. ८५० पेक्षा जास्त मुलांनी या स्पर्धेत निसर्गाच्या सान्निध्यात चित्र काढण्याचा आनंद अनुभवला. तसेच पालकांनी देखिल मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत मुलांचा चित्र रेखाटण्याचा आनंद अनुभवला.

2006 पासून तूकाई टेकडी बाणेर, येथे वसुंधरा अभियान या संस्थेकडून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्य चालू आहे. आतापर्यंत संस्थेने 45 हजार पेक्षा जास्त झाडे लावली असून, महाराष्ट्र शासनाने नुकताच श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अशा या संस्थेने केलेले हरित कार्य पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी, संस्था दरवर्षी टेकडीवर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे विनामूल्य आयोजन करत असते.

मुक्त वातावरणात, निसर्गामध्ये निसर्ग चित्र काढण्याचा आनंद घेतला. छान पैकी मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात येऊन चित्र काढले व सुंदर परीक्षण होऊन योग्य चित्रांना पारितोषिक प्राप्त झाले. अतीशय नियोजन पद्धती वसुंधरा अभियान टीमने ही स्पर्धा राबवली आणि यशस्वी केली.

विजेते
5 वर्षे आतील मुले
1.अविका एस.
2.गौरंश जगदाळे
3. मनश्री देशमुख
4. अथर्व गरड

पहिली ते चौथी
1.ओवी कोठावदे
2. आद्या मुसाने
3.स्वरा कोठाळे
4.अनुष्का टिळेकर

पाचवी ते सातवी
1.नेहा मानमोडे
2.वैभवी भांडारकर
3. आस्था महाडिक
4. अदीप सोनगिरे

आठवी ते खुला गट
1. आर्या धनकुडे
2.अनुष्का कडू
3. श्रेया घायतिडक
4.मंगला वाडेकर आणि कोमल नवरखेडे
विशेष कलाकार पुरस्कार
राजेंद्र कांबळे