November 22, 2024

Samrajya Ladha

औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी, पश्चिम पुणे मधील काही भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार..

पाषाण :

एसएनडीटी एचएलआर टाकी, चतुःश्रुंगी, चांदणी चौक, कोंढवे धावडे टाकी येथील जलवाहिनीचे दुरुस्ती व जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. २१) पश्चिम पुण्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बुधवारी (ता. २२) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे:एसएनडीटी एचएलआर टाकी परिसर,हॅपी कॉलनी गल्ली क्रमांक ४, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी काशिनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, ओढ्याजवळ, केळेवाडी, हनुमान नगर, रामबाग कॉलनी, एम.आयटी रस्ता डावी व उजवी बाजू, मागील बाजू, शिल्पा सोसायटी, यशश्री सोसा. सीमा १, कानिफनाथ, जीवनछाया सोसा, एलआयसी कॉलनी, रामबाग कॉलनी,

माधव बाग, मॉडर्न कॉलनी, जय भवानी नगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, साम्राज्य, कांचनबाग,लिलापार्क, सिल्हरक्रेस्ट ऑर्नेट, रमेश सोसायटी, शेफालिका आर्चीड मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती रोनक शिवगोरख,गोदाई, लोटसकोर्ट, ऋतुजा जानकी बळवंत, चिंतामणी सोसा, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनी मागील भाग, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर,

वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्रमांक १ ते २१, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, दुधाणे नगर, सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्रमांक१ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी बुद्धविहार पर्यंतचा संपूर्ण परिसर, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल मागील भाग, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (सम गल्ली),

आनंदनगर, मधुर कॉलनीचा भाग, आयडियल कॉलनी भाग, पौड रोडचा पौड रस्त्याची डावी बाजू महागणेश सोसा., ईशदान सोसायटी, सर्वत्र सोसायटी, प्रशांत न्यू. अजंठा, प्रतीक नगर,मधुराज नगर, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, डीपी रस्त्याची डावी बाजू , शिवशक्ती सोसायटी, सकाळ नगर औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हणमळा भाग, लमाणतांडा वस्ती,

पाषाण गावठाण काही भाग, चव्हाण नगर पोलिस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत.

मोहननगर, लक्ष्मण नगर, राम नगर- राम इंदू पार्क, बालेवाडी गावठाण, दसरा चौक परिसर, पाटील नगर, शिवनेरी पार्क, सन हॉरीझन, हायस्ट्रीट परिसर, नंदन प्रोसपेरा,४३ प्रायवेट ड्राईव्ह, मधुबन सोसायटी परिसर कुणाल एस्पायर, बिट वाईज परिसर, एफ रेसिडन्सी, पार्क एक्सप्रेस परिसर, आयवरीस टॉवर वारजे.

कोंढवे धावडे गावठाण, खडकवस्ती, १० नंबर गेट, टेलिफोन एक्स्चेंज परिसर, न्यू कोपरे संपूर्ण परिसर उत्तमनगर गावठाण, उत्तमनगर उर्वरित परिसर, देशमुख वाडी, सरस्वती नगर, पोकळेनगर, इंडस्ट्रिअल एरिया शिवणे गावठाण, शिवणे संपूर्ण परिसर इंगळे कॉलनी.