November 22, 2024

Samrajya Ladha

औंध येथील मुलांनी दिवाळीनिमित्त तयार केला ‘मल्हार गड’ किल्ला..

औंध :

औंध येथील दहावी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळुन दिवाळी निमीत्त मल्हार गड किल्ला तयार केला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या मुलांनी हा किल्ला तयार करत आपल्या इतिहासाची आवड किल्ला बनवत झोपसली आहे.दिवाळी आली की किल्ला बांधण्यासाठी तयार करण्यासाठी मुलांची मोठी लगबग असते. मोठया उत्साहात कल्पकतेने मुलांनी हा किल्ला तयार केला आहे.

मल्हार गड हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. भीवराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो. पुण्यातील सासवड जवळ हा किल्ला आहे.

मल्हार गड (किल्ला) तयार करणारे कलाकार
१) कु. श्लोक शैलेश खराटे इयत्ता १० वी
२) कु.राजविर गजानन (रोहन) शिंदे इयत्ता २ री
३) कु शैर्य राहुल सोडनर इयत्ता ३ री
४) कु. शुयश लटके इयता ९ वी
५) कु. रोहीत लटके इयत्ता ३ री
६) कु. दुर्वाकुर सचिन सोनवणे इयत्ता ८ वी
७) कु. शंतनु सचिन सोनवणे इयत्ता ७ वी
८) कु. कैवल्य विशाल शिंदे इयत्ता १ ली
७) कु. आयुष मुकेश ससाने इयत्ता ६ वी
८) कु. अंश राकेश ससाने इयत्ता २ री
९ ) कु. अक्षय कैलास पवार इयत्ता १२ वी