June 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद…

औंध :

औंध येथे प्रभागातील नागरिकांसाठी औंध भाजपा च्या वतीने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मा.नगरसेवक श्री.प्रकाश ढोरे. सौ.प्रिती शिरोडे, स्विकृत नगरसेवक श्री.बाळासाहेब रानवडे व श्री.सचिन मानवतकर यांनी केले.

अप्रतिम असे कलाकार व मंत्रमुग्ध करणारी त्यांची गायकी. रसिकांनी देखील मोठ्या संखेने उपस्थित राहुन त्यांना भरभरुन असा प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. औंध मधिल नागरिकांची दिवाळी पहाट संगीतमय झाली.

यावेळी मा.सचिन वाडेकर व मा.आनंद छाजेड, मा.सुरज गायकवाड, मा.अक्षयभाऊ घडसिंग, मा.रितेश घडसिंग, मा.रामभाऊ मंडलीक, मा.अशोक काका अवताडे तसेच प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.