August 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

४० टक्के कर सवलत नोंदणीसाठी मुदतवाढ द्या सुनील माने यांची आयुक्तांकडे मागणी

पुणे :

पुणे महापालिकेतील निवासी मिळकत धारकांना ४० टक्के कर सवलत नोंदणीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. आयुक्त विक्रम कुमार यांनी ही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

 

आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या महानगरपालिकेकडून निवासी मिळकत धारकांना ४० टक्के कर सवलत देण्यासाठी मागणी अर्ज पीटी ३ स्वीकारणे सुरु आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. या अर्जासोबत रहिवासी पुरावा देणे बंधनकारक आहे. मात्र या आधी ज्यानी कागदपत्रे काढलेली नाहीत किंवा ज्याना कागदपत्रे ट्रान्सफर करायची आहेत, त्यांना दिवाळी मुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कारण बहुतांश कार्यालये दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी असल्याने बंद आहेत. तसेच अनेकजण दिवाळी सुट्टिसाठी बाहेरगावी गेले आहेत. परिणामी अनेक नागरिकांना या ४० टक्के मिळकत सवलती पासून वंचित राहावे लागणार आहे. याबाबत आपण विचार करून रहिवासी पुरावा सादर करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी आशी विंनती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी ही याबाबत मिळकत करधारकांना सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.