June 3, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथील सचिन दळवी यांना टाइम्स ऑफ पुणे यांच्या वतीने ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान…

औंध :

सोमेश्वरवाडी येथील भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर विभाग सरचिटणीस सचिन दळवी यांना टाइम्स ऑफ पुणे यांच्या वतीने राजकीय सामाजिक सांप्रदायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भाजपा आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’ हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

पुरस्कार मिळणे नेहमीच प्रेरणदायी असते, अशा पुरस्कारामुळे उत्साह द्विगुणित होऊन समाजाप्रती आणखी सेवा करण्यास प्रेरणा मिळते. मला सतत मार्गदर्शन करणारे सर्वच हितचिंतक मित्रपरिवार आणि माझे कुटुंब यांच्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला सगळ्यांचे मनापासून आभार : सचिन दळवी (सरचिटणीस भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर विभाग)

हा पुरस्कार औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात प्रधान करण्यात आला.