December 3, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथिल प्रवीण शिंदे यांची भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी सरचिटणीस पदी नियुक्ती…

बाणेर

बाणेर येथिल प्रवीण शिंदे यांची भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच केबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रवीण शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी एकदा पुणे महानगर पालिकेची निवडणुक देखील मनसे कडून लढविली होती.

पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी माझ्यासाठी उत्साह वाढविणारी असून, सर्वांना सोबत घेऊन पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत राहील, व पक्षाच्या आचार विचारांचे पालन करून संघटनेची विचारधारा नागरिकांपर्यंत पोचविण्यात प्रयत्नशील राहील : प्रवीण शिंदे (सरचिटणीस भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी)