November 21, 2024

Samrajya Ladha

लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित ‘सूर संध्या’ कार्यक्रमात महेश काळे यांच्या स्वरांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध…

बाणेर :

लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित ‘सूर संध्या’ कार्यक्रमात राष्ट्रपती पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या अलौकिक स्वरांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या टाळ्यांच्या प्रतिसादात सायंकाळीन मैफिल सजली. कार्यक्रमाची सुरूवात पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन करून केली. तसेच कार्यक्रमाच्या मध्यंतरी बालेवाडी, बाणेर, औंध, सूस, म्हाळुंगे या गावातील सामाजिक, क्रिडा, सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

महेश काळे यांच्या स्वरांनी प्रेक्षकांना सामावून तर घेतलेच पण अवघा सभागृह रामनाम आणि विठू माऊली यांच्या सुरात मंत्रमुग्ध होऊन तल्लीन झाला.

केवळ राजकारण म्हणून काम न करता गेले अनेक वर्ष सामाजिक भावनेतून लोकांसाठी काम करणारे नेतृत्व केवळ नागरीकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यावर न थांबता सामाजिक बांधिलकी जाणिवेतून समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात सर्व समावेशक नेतृत्व म्हणून लहू अण्णा बालवडकर यांच्या कडे पाहिले जाते : मुरलीधर मोहोळ (माजी महापौर/ भाजपा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस)

सामजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना समाजाप्रती संवेदनशिल, प्रतिबद्धता असणारे नेतृत्व म्हणून लहू बालवडकर यांनी आपल्या भागातील नागरिकांना काय दिले म्हणजे त्यांची मानसिक भूक भागेल हा विचार अमलात आणत नागरिकांची दिवाळी सुरमय करत सूर संध्या हा कार्यक्रम सलग तिसऱ्या वर्षी आयोजीत केला आहे : राजेश पांडे (भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष)

यावेळीप्रमूख पाहुणे पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, नि.सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, नि. स. पो. आयुक्त कैलास पिंगळे, नि. पो. निरीक्षक संजय निकम भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राज्याचे ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, कोथरुड विधानसभा उत्तर विभाग अध्यक्ष सचिन पाषाणकर, सचिन दळवी, राहूल कोकाटे, विद्या बालवडकर, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, आणि भाजपा पदाधिकारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.