June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथिल निखिल धनकुडे यांची पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड..

पुणे :

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निखील नंदकुमार धनकुडे यांची निवड करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते देण्यात आले. हि नियुक्ती पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यावतीने करण्यात आली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटन वाढीच्या अनुषंगाने हि निवड करण्यात आली आहे.

 

निवड झाल्याचा आनंद असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन युवकांची बांधणी करुण संघतेनेनी दिलेली जबाबदारी मोठया उत्साहात सर्वांना बरोबर घेऊन पार पाडेल. अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सोबत काम करताना ऊर्जा मिळणार असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू : निखिल धनकुडे(उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

यावेळी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष मनोज बालवडकर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रसाद चौगुले उपस्थित होते.