बालेवाडी :
बालेवाडी येथील लहू बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोथरुड उत्तर विधानसभा मतदार संघ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आज महारक्तदान शिबिर संकल्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी विक्रमी १२७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करता यावे याकरिता युवकांनी रांगा लावत रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी फार मोठा प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला.
लहू बालवडकर,सचिन दळवी, शिवम सुतार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी मिळून माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान संकल्प शिबीर राबविले त्यास युवकांचा लाभलेला प्रतिसाद पाहता मी कृतज्ञता व्यक्त करतो. येवढ्या मोठया उत्साहात सर्वांनी रक्तदान करून माझा वाढदिवस साजरा केला. या पेक्षा चांगला वाढदिवस साजरा होऊ शकणार नाही : माजी महापौर मुरलीधर मोहोळ
आम्ही आव्हान केल्या नंतर मित्र परिवाराने मोठ्या उत्साहात रक्तदान केले व विक्रमी रक्तदान करण्यात हातभार लावला. आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करता यावे म्हणुन रांगेत उभे राहुन युवकांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी देखिल रांगा लावल्या जातात हा उत्साह पाहून मनाला समाधान प्राप्त झाले : लहू बालवडकर (चिटणीस भाजपा पुणे शहर)
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…