November 21, 2024

Samrajya Ladha

दातृत्वाची आणि कर्तुत्वाची दिवाळी नागरिकांची साजरी व्हावी म्हणून कळमकर कुटुंबाकडून सरंजाम वाटप : चंद्रशेखर बावनकुळे( भाजपा महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष)

बाणेर :

सर्व सामान्य माणसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या माध्यमातून बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे गावातील ५००० कुटुंबांना गोरगरीब नागरिकांना सरंजाम वितरण करण्यात आले.

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या धोरणाचा अंगीकार करून त्यानुषंगाने भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे कार्यरत आहे आणि हीच खरी भाजपची विचारधारा आहे. परिस्थिती कशीही असो सर्वांना आपल्या हिंदू धर्मातील सण चांगल्या पद्धतीने साजरा करता यावेत, या सणांमध्ये नागरिकांना आनंद मिळावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी गोरगरीब नागरिकांना सरंजाम वितरण करण्यात येते : मा. नगरसेविका ज्योती कळमकर

यावेळी प्रास्तविक करतांना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले की, भाजपा सरकार काळात विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला. आपल्या परीसरात दोन एसटीपी प्लांट उभे राहणार आहेत. सूस रोड वरिल गारबेज प्लांट मुळे नागरीक त्रस्त असून तो प्लांट हलवून नागरिकांना होणारा त्रास दूर करायचा आहे. या सर्व का समस्या सोडवित असताना गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने सरंजाम वाटप करत आहे पुढील वर्षी पासुन दिवसभर सरंजाम वाटप करुण नागरीकांना हवं त्या वेळेस येवून सरंजाम घेऊन जाता यावा अशी सोय करण्याचा निर्धार कळमकर यांनी व्यक्त केला.

सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अनेक अष्टपैलू कर्तुत्वाची नगरसेविका आणि गणेश कळमकर यांनी समाजातील सर्वसामान्य व्यक्तींच्या कल्याणाकरिता सर्वांच्या जीवनात वीविध उपक्रम राबवित पोहचण्याचा प्रयत्न केला, नागरिकांची सेवा केली. दातृत्वाची आणि कर्तुत्वाची दिवाळी नागरिकांची साजरी व्हावी म्हणून सरंजाम वाटप करुन कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व म्हणून कळमकर परिवाराने काम केले आहे : चंद्रशेखर बावनकुळे( भाजपा महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष)

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भाजपा पुणे शहराध्यक्ष मा.धीरजजी घाटे, प्रदेश उपाध्यक्ष मा.राजेशजी पांडे, जगदीशजी मुळीक, सचिन पाषाणकर, डॉ संदीप बुटाला, पूनित जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, प्रल्हाद सायकर, लहू आण्णा बालवडकर, सचिन दळवी, राहूल कोकाटे, विवेक मेहता, उत्तम जाधव, उमा गाडगीळ, सुभाष भोळ, मोरेश्वर बालवडकर, मा बबनराव चाकणकर, प्रवीण शिंदे, काळूराम गायकवाड, शरद भोते, संदीप वाडकर, सागर ताम्हाणे, निलेश सायकर, संदीप कळमकर, लखन कळमकर, महेंद्र सायकर, रवींद्र सायकर, भरत कळमकर, सुरेश कळमकर, प्रमोद कळमकर, सुधीर ताम्हाणे, महादेव सायकर, नितीन सायकर, दिनेश चाकणकर, प्रशांत म्हेत्रे, रवींद्र सायकर, प्रानेश सायकर, किरण सायकर, सतीश बागल, महादेव साळवणे, मिरा पारगावकर, निकिता मातडीे यादी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते..!

गेली महिनाभर जनसंपर्क कार्यालयातील सर्व कुटुंबातील सदस्य आणि माझे सहकार्यांनी अथक परिश्रमातुन हा सरंजाम वाटपाचा कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी जो हाथभार लावला त्याबद्दल सर्वांचे माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी मनःपुर्वक आभार व्यक्त केले.