December 3, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे जीवन चाकणकर यांच्या वतीने स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड..

बाणेर :

बाणेर बालेवाडी परिसरात काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे ओबीसी विभाग उपाध्यक्ष जीवन चाकणकर यांच्याकडून पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांची दिवाळी गोड करण्याकरिता मिठाईचे वाटप करण्यात आले.

आपला परिसर स्वच्छ राखत आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची आपण काळजी घ्यावी या हेतूने त्यांची दिवाळी गोड असावी म्हणून खास त्यांच्या साठी मिठाई वाटप करत आहे : जीवन चाकणकर (उपाध्यक्ष ओबीसी विभाग पुणे शहर काँग्रेस)

जीवन चाकणकर यांनी गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली असावी या उदात्त हेतूने आपले मतदार नसलेल्या पण परिसर स्वच्छ करण्यात कायम अग्रेसर असणाऱ्या स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा विचार केला आहे.

यावेळी भाऊसाहेब चाकणकर, तुकाराम चाकणकर, महेंद्र गंगावणे, दीपक कुंभार, अमोल कळमकर, प्रवीण कांबळे, पप्पू चाकणकर, दयानंद चाकणकर, नितीन आल्हाट, सोहम चाकणकर, इजाज इनामदार, राहुल बेटकर, विक्रम शेळके तसेच जीवन चाकणकर मित्रपरिवार व जीवन चाकण सोशल वेल्फेअर चे सभासद उपस्थित होते.