August 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज महारक्तदान शिबिराचे आयोजन..

बालेवाडी :

बालेवाडी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोथरुड उत्तर विधानसभा मतदार संघ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आज महारक्तदान शिबिर संकल्प आयोजित करण्यात आले आहे.

 

या रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्याकरिता त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सिनेअभिनेते प्रविण तरडे आणि रमेश परदेशी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

मुरलीअण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त
महारक्तदान शिबीर
आम्ही सामील होतोय तुम्हीपण सामील व्हा.. 🙏🏻
बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत.

स्थळ : भाजपा जनसंपर्क कार्यालय, बाणेर-बालेवाडी रोड, ब्रेव्हिया सोसायटी समोर…..

चला रक्तदान करूया🩸 रक्ताचा तुटवडा कमी करुया…..