November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेरकरांची दिवाळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गोड! नाममात्र दरात फराळ उपलब्ध उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाणेर :

कोथरुड विधानसभा मधील प्रत्येक नागरिकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला असून, या उपक्रमास बाणेर-बालेवाडी-पाषाण सूस मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत याचा लाभ घेतला.

कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी; या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून दरवर्षी नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देतात. ना. पाटील यांच्या या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी मध्ये मोठा आधार मिळातो. अनेकजण याचा लाभ घेत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतात.

यंदाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिवाळीसाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला असून; आज (६ नोव्हेंबर रोजी) बाणेरमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हा दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला. या उपक्रमामध्ये बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस भागातील नागरिकांनी लाभ घेतला. दुपारी २ ते ७ यावेळेत फराळ वाटप करण्यात आले.

दरम्यान, उद्या मंगळवार आणि बुधवार (७ आणि ८ नोव्हेंबर रोजी) कोथरुड मधील नागरिकांसाठी दुपारी २ ते सायं‌. ७ वेळेत नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच, उद्या मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते सायं. ७ वेळेत कसबा मधील नागरिकांसाठी ही हा फराळ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कोथरुडमधील नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय आणि कसबा भागातील पवळे चौक येथील भारतीय जनता पार्टी नागरी सुविधा केंद्र येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.