February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील राहुल बालवडकर यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती..

बाणेर :

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या शहर उपाध्यक्ष पदी बालेवाडी येथील राहुल बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते आणि आमदार निलेश लंके व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समिर चांदेरे यांच्या उपस्थित पत्र प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या सहकार्याने आणि आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करत पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी पक्षाचे विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाचा विस्तार आणि संघटन वाढविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पार पाडणार : राहुल बालवडकर(उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

यावेळी पी.डी.सी.सी बँक उपाध्यक्ष चांदेरे, सागर बालवडकर(सचिव खंडेराय प्रतिष्ठान), मनोज बालवडकर(उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस)आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.