November 22, 2024

Samrajya Ladha

गोरगरीब कष्टकरी नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सरंजाम वाटप : माजी नगरसेवक/स्थायी समिती चेअरमन बाबुराव चांदेरे

बाणेर :

गोरगरीब कष्टकरी नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून २००६ पासून सुरू केलेल्या दिवाळी सरंजाम वाटपाच हा कार्यक्रम पारनेर-नगरचे लोकप्रिय आमदार मा.निलेश लंके यांच्या शुभहस्ते पार पडला.

आज मला जे काही यश मिळाल आहे त्यामागे अनेकांचा हातभार आणि आशीर्वाद आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून गेली अनेक वर्षे माझ्या प्रभागातील कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्याही कुटुंबात आनंदाचे चार क्षण साजरे करता यावेत म्हणून मी दिवाळी सरंजाम वाटपाचा उपक्रम हाती घेतला असे माजी नगरसेवक/स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

पुढे ते म्हणाले की l, माझी तब्येत ठीक नसल्याने मी शरीराने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही पण मनाने मी कार्यक्रमात होतो.सोशल मीडियामधून संपूर्ण कार्यक्रम बघत होतो. महागाई प्रचंड वाढलेली असताना हजारो कुटुंबियांची दिवाळी आपल्या मुळे गोड होतेय याचं मिळालेले समाधान शब्दांत मांडू शकत नाहीये.

दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमासाठी पारनेर-नगर चे आमदार श्री निलेश लंके यांच्यासह, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री दिपकभाऊ मानकर, ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, ग्राहक पेठचे श्री सूर्यकांत पाठक, पुणे जिल्ह मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित होते.

श्री राहुल बालवडकर (उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पुणे शहर),
श्री नितीन कळमकर (कार्याध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,कोथरुड मतदार संघ),
श्री समीर बाबुराव चांदेरे (अध्यक्ष – पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी),
श्री सागर बालवडकर (सचिव-खंडेराय प्रतिष्ठान),
श्री पूनम विशाल विधाते (सदस्य – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या सह स्थानिक पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते, माझे सहकारी या सर्वांनी गेल्या काही दिवसांपासून या उपक्रमासाठी खूप मेहनत घेतली म्हणून दिवाळी सरंजाम वाटप २०२३ कार्यक्रम यशस्वी आणि निर्विघ्न पार पडला. यासर्वांचे मनापासून आभार तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चांदेरे यांनी व्यक्त केल्या.

यंदाच्या दिवाळी सरंजाम कार्यक्रमाचे ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीने आणि अमोघ वाणीने वातावरण बदलून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांच्या सुश्राव्य पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.