November 21, 2024

Samrajya Ladha

मुळशी तालुक्यतील सुवर्णा माने समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्काराचा मानकरी. 

पुणे :

आधार सोशल फाऊंडेशन बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्कार मुळशी तालुक्यातील सुवर्णा माने यांना आधार सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी हा पुरस्कार देण्याचे जाहीर करत अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचा मानस कन्या डॉ सौ सुनीता माई मोडक यांचा हस्ते प्रधान केला.

सुवर्णा माने यांनी निलमसंस्कृती फाऊंडेनचा माध्यमातुन अनेक उपक्रम राबविले. त्यांनी छोट्याशा खेड्यातून सुरवात करत मुळशीतील गाव गावात विविध उपक्रम राबविले. त्यांनी निलमसंस्कृती फाऊडेशनचा आधारावर महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे. गोरगरिबांना नेहमी हॉस्पिटल प्रॉब्लेम असो किंवा मुलांचे एडमिशन असो नेहमी मदतीची धाव घेऊन आधार देत असतात. पीगी बँकेचा माध्यमातून लघु उद्योग सुरू करून बचत कशी करायची हे ही महिलांना मार्गदर्शन करतात. आज या उप्रमाअंतर्गत बऱ्याच महिला आपल्या पायावर सक्षम आहेत. असे अनेक उपक्रम सौ माने ताईंनी राबवले आहे. महिला आरोग्य, महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

यावेळी प्रसिद्ध प्रवक्ते डॉ प्रकाश कदम, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे डॉ रवींद्र कुलकर्णी, डॉ सौ कल्याणी कुलकर्णी (मोडक), डॉ वाल्मीक वाघ, सौ प्रिया वाघ , डॉ काळूराम मालगुंडे, डॉ धोंडीबा कुंभार, डॉ संभाजी बन्ने, आदी मान्यवर उपस्थित होते.