March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राजाभाऊ गुडदे फाउंडेशन तर्फे राबविला बाल दीपोत्सव -२ उपक्रम

बालेवाडी :

बालेवाडी दिवाळीनिमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशन तर्फे बाल दीपोत्सव-२ उपक्रम ४ नोव्हेंबर २०२३ रोजी श्री मन शांती छात्रालय शिरूर येथे राबविण्यात आला. संस्थेतील ८० अनाथ निराधार मुलांना दिवाळी फराळ, फटाके, मोती साबण, उठणे, सुगंधी तेल, अगरबत्ती, बिस्किट व चॉकलेट देण्यात आले तसेच ज्यूट ची टिफिन बॅग देण्यात आली. तेथील कर्मचारी वर्गाला फराळ, दिवे, तेल, रांगोळी, अगरबत्ती अशा सर्व वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. क्रिकेटचे साहित्य मुलांना देऊन आगळावेगळा बालदीपोत्सव-२ उपक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशा मालुसरे या उपस्थित होत्या त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम अगवणे सर यांनी केले. विनय सपकाळ यांनी छात्रालय विषयी माहिती सांगितली.

राजाभाऊ गुडदे फाउंडेशन तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब विद्यार्थांना मदत केली जाते.

या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ किरण संगीत गुडदे, संगीत गुडदे, अनिमेश गुडदे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, गोरल गवारे, मनोज जोशी, गिरीजा जोशी, मृणाल जोशी, मनोज माने, पंकज बोरोले, अमोल बगडिया, निधी बोरोले, शैलेश अपोतीकर, समीर गावडे, राहुल बाकडे, अनमोल शिंदे, नेहा रसाने, सुशांत सालुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.