August 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी दसरा चौक ते कुणाल एस्पायरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू

बालेवाडी :

आज बालेवाडी दसरा चौक ते कुणाल एस्पायरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ परिसरातील द पर्ल, पार्कलॅंड, आदित्य ब्रिज पार्क, कुणाल एस्पायरी, साई ईशान्य अशा विविध सोसायटीतील नागरीकांच्या शुभहस्ते करण्यात आला.

 

गेली अनेक महिन्यांपासुन या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली होती. नागरीकांना रहदारीस तसेच या रस्त्यालगत असणार्या सोसायटीतील नागरीकांना धुळीचा देखिल मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. यामुळे येथील ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याचा देखिल प्रश्न निर्माण झालेला होता. हि गोष्ट निदर्शनास आल्यानंतर तातडीने पुणे मनपाकडे पाठपुरावा करुन या रस्त्याचे डांबरीकरण आज सुरु करण्यात आले : माजी नगरसेवक अमोल बालवडकर

यावेळी माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका नगरसेविका स्वप्नाली सायकर, कोथरुड वि. (उ) अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रकाशतात्या बालवडकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, हभप संजयबाप्पु बालवडकर, उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर, महिला मोर्चा अध्यक्षा अस्मिताताई करंदिकर, प्रभाग अध्यक्ष सुभाषजी भोळ, अनिलतात्त्या बालवडकर, नितिनजी रनवरे, निलेशजी सायकर, सागर बालवडकर, प्रविण बालवडकर, विशाल बालवडकर, अनिल प्रधान तसेच परिसरातील सोसायटीमधील श्री.मोहिले काका, श्री.जोशी काका, श्री.तोरेंद्र टंक, श्री.समिर जोशी, श्री.टिके दास, श्री.कटारीया, श्री.नेमाडे, सौ.सोनाली कुलकर्णी, ॲड.तारे, श्री.त्रिपाठी, श्री.मेहता व इतर नागरीक तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.