September 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे सदगुरु महिला मंडळ तर्फे सॅनिटरी पॅड विषयी मार्गदर्शन

बाणेर :

सदगुरु महिला मंडळ यांच्या वतीने पुणे येथील बाणेर येथे सॅनिटरी पॅड संदर्भात मार्गदर्शन महिलांना करण्यात आले. यावेळी अहिल्या आणि सावित्री महिला बचत गटाचे सदस्या उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी चांगल्या प्रकारे उपस्थिती दर्शविली होती. बाणेर गावात महिलांना सॅनिटरी पॅड संदर्भात माहिती देण्यासाठी क्लब हाऊस विंडसर सोसायटी बालेवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आले होते. बालेवाडी फाटा, बाणेर येथील श्री सद्गुरु महिला बचत गट यांच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी केबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने आरोग्यदायी सॅनिटरी पॅड वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

यावेळी मासिक पाळीच्या दिवसांत सॅनिटरी नॅपकिन्स वापरायचे की पूर्वीच्या स्त्रिया वापरत तसा सुती कपडा वापरायचा, स्वच्छता कशी पाळायची यावर तज्ज्ञ मंडळींनी केलेलं मार्गदर्शन केले आहे. कमीत कमी दरात महिलांपर्यंत कसे पोहोचतील आणि चांगले दर्जाचे कसे मिळतील याबद्दल महिलांना माहिती दिली आहे. यावेळी अहिल्या महिला बचत आणि सावित्री बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला नगरसेविका ज्योती कळमकर आणि माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि विद्याताई लहू बालवडकर या उपस्थित होत्या आणि त्यांनी कुठले कार्यक्रम महिलांपर्यंत पोहोचावे याचे बद्दल मार्गदर्शन केले.