June 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर मध्ये रंगला खेळ पैठणीचा, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाणेर :

बाणेर (विधातेवस्ती ) येथील तुळजाभवानी प्रतिष्ठान व यशवंत मित्र मंडळ आयोजित महाहोम मिनिस्टर ह्या खेळ रंगला पैठणीचा ह्या कार्यक्रमाचे बहारदार आयोजन करण्यात आले. खेळ,गप्पा, गोष्ठी, उखाणे याद्वारे महिलांनी ह्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

 

महा होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक – राणी झिरपे, द्वितीय क्रमांक – शिल्पा इजगज, तृतीय क्रमांक – सारिका गवळी, चतुर्थ क्रमांक – सोनाली भोजने, पाचवा क्रमांक – जिन्नत पटेल ह्या महिला भगिनींनी पटकावला. तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या शकुंतला गव्हाणे यांना मानाची पैठणी, उत्कृष्ठ उखाण्याबद्दल निर्मला भालेराव ह्यांना सोन्याची नथ भेट देण्यात आली.तसेच सर्व सहभागी महिलांना नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

ह्या कार्यक्रमासाठी पुणे मनपा स्थायी समितीचे मा.अध्यक्ष माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे , युवा नेते राहुल बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर चांदेरे, सौ पूनम विशाल विधाते, सौ.ज्योती बालवडकर, मनोज घुले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चिटणीस राखी श्रीराव, विनायक काकडे, विजय विधाते, भगवान विधाते, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या अध्यक्षा वैशाली तापकीर, विशाल विधाते, तुळजाभवानी प्रतिष्ठान व यशवंत मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.