June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील श्री तुकाई माता मंदिर व श्री बाणेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन संपन्न..

बाणेर :

बाणेर येथील श्री तुकाई माता मंदिर व श्री बाणेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पुर्ण झाले असून त्याचे उद्घाटन माजी स्थायी समिती अध्यक्ष/ नगरसेवक बाबुराव चांदेरे आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते संपन्न झाले. नवरात्री उत्सव सुरू होताना भाविकांची मोठी सोय यामुळे झाली आहे.

बाणेर गावच्या वैभवशाली इतिहासात महत्त्वपूर्ण असलेल्या आणि भाविकांची रेलचेल असलेला हा रस्ता पुर्ण व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. त्यासाठी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी प्रयत्न करून श्री राजेंद्र ज्ञानोबा मुरकुटे,श्री जयवंत ज्ञानोबा मुरकुटे,श्री अजय मदन मुरकुटे,श्री विजय मदन मुरकुटे व श्री वृषभ राजेंद्र मुरकुटे यांच्या सहकार्यानी रस्त्याचे काम पूर्ण केले. यामुळे भाविक आणि तुकाई टेकडीवर येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

याप्रसंगी श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट व श्री तुकाई माता सेवा ट्रस्ट मधील सभासद उपस्थित होते.