September 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर रस्त्यावर अतिक्रमण विभागाची कारवाई, गावठाण हद्दीतील चुकीच्या कारवाईचा नागरिकांसह प्रल्हाद सायकर यांनी व्यक्त केला निषेध..

बाणेर :

बाणेर मुख्य रस्त्यावर पुणे महानगरपालिका तर्फे अनधिकृत बांधकामे व दुकानापुढे बांधण्यात आलेल्या शेडवर तसेच विद्युत खांबांवरील अनधिकृत केबलवर कारवाई करण्यात आली. कोणत्याही नोटिसा न देता कारवाई करण्यात आल्याचा निषेध करीत भाजपा महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर यांनी स्थानिक नागरिकांसह जेसीबी समोर बसुन आंदोलन केले.

बाणेर रस्त्यावर अतिक्रमण विभागाने फार मोठी कारवाई केली. पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभाग, पथविभाग ,विद्युत विभाग तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

गावठाण हद्दीत कोणत्याही नोटिसा न देता बेकायदेशीररित्या कारवाई केली असुन योग्य मोजमाप घेऊन नागरीकांना विश्वासात घेत कारवाई करावी. अनधिकृत अतिक्रमण पडावे परंतु नागरीकांच्या हद्दीत घुसत कारवाई करू नये अशी मागणी नागरीकांच्या वतीने करत आहे. नागरीक उस्फूर्तपणे बेकायदेशीर कामे काढून घेण्यास तयार आहेत : प्रल्हाद सायकर(भाजपा महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस)

सदर कारवाई करताना मोठ्या प्रमाणात दूजाभाव करण्यात आला आहे. एलिफंट हॉटेल शेजारील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली परंतु एलिफंट हॉटेलला मात्र अभय देण्यात आले. यावेळी रस्त्यावर येणाऱ्या केबल देखिल मोठ्याप्रमाणात कट करण्यात आल्या. अतिक्रमण कारवाई मुळे रस्ता मोकळा श्वास घेत आहे.