बाणेर :
पुणे महानगरपालिकेने 2023 मद्ये वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांच्यासाठी लकी ड्रॉ योजना राबविली यामध्ये माजी नगरसेविका ज्योती कळमकर व गणेश कळमकर यांना फोर व्हीलर पेट्रोल कार बक्षीस मिळाली होती त्याचा बक्षीस वितरण समारंभ आज पुणे जिल्हाचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडला.
लकी ड्रॉ मध्ये नगरसेविका ज्योती कळमकर व गणेश कळमकर यांना फोर व्हीलर कार गिफ्ट मिळाली होती त्या बदल्यात प्रभागातील नागरिकांसाठी रुग्णवाहीका मिळावी अशी विनंती त्यांनी केली, विनंती मान्य करून आज नागरिकांच्या सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या शुभहस्ते रुग्णवाहीका दिली. कळमकर कुटुंबीयांनी बक्षीस मिळाले मिळाले जाहीर केले होते की, बक्षीस जनसेवेसाठी समर्पित करत कार च्या बदल्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून घेत दिलेला शब्द पाळला. खऱ्या अर्थाने त्यांची प्रभागांतील नागरिकांप्रती असलेली निष्ठा आपुलकी सर्वांसमोर आली. आपल्या कृतीतून त्यांनी जनसेवेचा ध्यास दाखवून दिला आहे.
मिळालेले बक्षीस जनसेवासाठी वापरता यावे या उदात्त हेतूने रुग्णवाहिका स्वीकारणाऱ्या माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या या निर्णयाचे नागरिकांनी कौतुक करत स्वागत केले.
पालिका आयुक्त व सर्व अधिकारी यांचे मनापासून आभारी आहोत. रुग्णवाहिका द्वारे आम्हाला नागरिकांची सेवा करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. ज्यांना पॅरालिसिसच्या उपचारासाठी निपाणी येथे जायचे असेल त्यांना हि रुग्णवाहिका मिळेल : गणेश कळमकर (भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष)
सीओईपी विद्यापीठ मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त अजित देशमुख आदी उपस्थित होते.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…