February 4, 2025

Samrajya Ladha

पेठ जिजापूर पाषाण येथिल लक्ष्मीमाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

पेठ जिजापूर पाषाण :

पेठ जिजापूर पाषाण येथील सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वीच्या लक्ष्मीमाता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाचे आधारस्तंभ कपिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सव निमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

दि. १६/१०/२०२३ रोजी धनकवडी येथील शंकर महाराज मठ भजनी मंडळाचे भजन करण्यात आले

दि. १७/१०/२०२३ रोजी देवीच्या गाण्याचा कार्यक्रम रात्री आठ वाजता आयोजित केला आहे.

दि. १८/१०/२०२३ रोजी परिसरातील महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रात्री आठ वाजता आयोजित केला आहे

दि. १९/१०/२०२३ रोजी सुतारवाडी येथील महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता आयोजित केला आहे.

दि. २०/१०/२०२३ रोजी लहान मुलांसाठी मनोरंजनाचे खेळ रात्री आठ वाजता आयोजित केले आहे.

दि. २१/१०/२०२३ रोजी देवीच्या सातव्या माळेचा भव्य मिरवणूक सोहळा रात्री आठ वाजता होणार आहे

दि. २२/१०/२०२३ रोजी अष्टमीनिमित्त होम हवन रात्री आठ वाजता होणार आहे.

दि. २३/१०/२०२३ रोजी रात्री आठ वाजता रास दांडिया चे आयोजन केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष गंगाराम चौगुले, मंडळाचे कार्याध्यक्ष ओमकार जाधव यांनी मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भक्तांनी भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.