April 12, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुतारवाडी पाषाण परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना शिवम सुतार यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट वाटप..

सुतारवाडी :

भाजपा युवा नेते शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त परिसर स्वच्छ करण्यास मोलाची भूमिका बजावणाऱ्या सुतारवाडी पाषाण परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना पावसा पासुन सुरक्षित राहता यावे याकरिता रेनकोटचे वाटप करण्यात आले.

 

याबद्दल माहिती देताना माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी सांगितले की, दिवस-रात्र, सर्व ऋतूंमध्ये परिसराच्या स्वच्छतेसाठी राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे भर पावसात स्वच्छ्ता कामाची गैरसोय होऊ नये, यासाठी आपली जबाबदारी ओळखून कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

पावसाळ्यात काम करताना स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. शिवम सुतार यांनी रेनकोट देऊन आमची फार मोठी अडचण दूर केली. त्यामुळे आम्हाला आमचे सफाई काम करताना पावसापासून बचाव होणार आहे. त्यांचे खूप खूप आभार अशी भावना सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.