पाषाण :
बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी शुभतेज मंगल कार्यालय पाषाण येथे सकाळी ७ ते ८ या वेळेत “मंगल संवाद” असा कार्यक्रम घेण्यात आला. रविंद्र जोशी अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन संयोजक हे कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कुटुंबामध्ये वावरताना वय वर्ष 50 वरील व्यक्तींनी कसे वागले पाहिजे. कुटुंबात मंगल संवाद कसा असावा याची या बद्दल माहिती देत कुटुंब प्रबोधन करण्यात आले.
संतोष सुतार यांनी प्रास्ताविक केले, राजेश सोनवणे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. विद्याधर देशपांडे यांनी सांघिक गीत सांगितले. रविजीं चे मा. सुभाष जी व मा. राजेंद्र जी यांचे हस्ते शाल श्रीफळ व तुळसी चे रोप देवून स्वागत केले. पसायदान ने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी सुभाष जी कदम, राजेंद्र सुतार, सारंग वाबळे आणि नागरिक उपस्थित होते.
उपस्थिती: १८८
महिला: ७६
पुरुष: ११२
More Stories
पाषाण येथील नवचैतन्य हास्य क्लब आखाडा गार्डन शाखेच्या वतीने भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
पेठ जिजापूर पाषाण येथिल लक्ष्मीमाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सुतारवाडी पाषाण परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना शिवम सुतार यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रेनकोट वाटप..