April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथील नवचैतन्य हास्य क्लब आखाडा गार्डन शाखेच्या वतीने भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

पाषाण :

नवचैतन्य हास्य क्लब आखाडा गार्डन पाषाण शाखा क्रमांक 150 च्या वतीने भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.

 

यावेळी उपस्थित बहुसंख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते प्रथमता संघाचे सभासद श्री लक्ष्मीकांत उपासने यांच्या पत्नीचे निधन झाले असल्यामुळे त्यांना सर्वांनी उभे राहून दोन मिनिटं श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर क्लबचे शाखाप्रमुख श्री भालचंद्र लेले यांचे चिरंजीव श्रीयुत नितीन लेले याने आयोध्या येथील बाबरी मशीद कारसेवेत सहभाग घेतला असल्यामुळे त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.

त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आले. त्यामध्ये मुख्यतः महिला सदस्यांनी राष्ट्रगीत व देश प्रेमाची गाणी सादर केली. तसेच संघाचे जेष्ठ सभासद श्री चंद्रकांत कुलकर्णी एक मुलाखत वजा एक अंकी कार्यक्रम सादर केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख व कार्यकारणी सदस्य यांनी सांघिक कामगिरी केली. त्यानंतर उपस्थितांना चहापान झाल्यावर कार्यक्रम संपन्न झाला.

You may have missed