May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर गावातील कै.सोपानराव बाबुराव कटके मनपा शाळेच्या मैदानावर पुणे जिल्हा कबड्डी निवड चाचणी अजिंक्य स्पर्धेला सुरुवात

बाणेर :

बाणेर गावातील कै.सोपानराव बाबुराव कटके मनपा शाळेच्या मैदानावर पुणे जिल्हा किशोर गट/ खुला ग अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह तथा माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील किशोर गटातील शेकडो खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सिध्दीविनायक मित्र मंडळाने आजच्या स्पर्धा आयोजित केल्या. किशोर गटातील खेळाडूंना पोषक वातावरण तयार करून दिले तर हेच खेळाडू भविष्यात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणार आहेत आणि यासाठी अजितदादा, तटकरे साहेब यांच्यासह कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कायम प्रयत्नशील असतात.

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य किरण चांदेरे आणि सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल भोरे, उपाध्यक्ष सिद्धाराम कलशेट्टी,सचिव राकेश सायकर, खजिनदार अमित धनकुडे, हरिष सुकनाळे, राजेश चौकीमठ यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियोजनात आजपासून सुरु झालेल्या स्पर्धा नक्कीच यशस्वी पार पडतील हा मला विश्वास आहे असे चांदेरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी समीर चांदेरे याची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे मधील ग्रामस्थांच्या वतीने खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पुण्याची ओळख असलेले ढोल-झांज पथके आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त रॅली काढली या रॅलीत परिसरातील नागरिक, कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर शकुंतला खटावकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मा.आमदार दिनकर पाटील, खजिनदार मंगल पांडे, सह सचिव मोहन गायकवाड यांच्यासह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ.संगीता कोकाटे, सौ.मोहिनी जोग(चाफेकर), नियामक मंडळ सदस्या सौ.वासंती बोर्डे(सातव), कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, उपकार्याध्यक्ष राजेंद्र काळोखे, सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा कविता आल्हाट, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, अर्जुनवीर पुरस्कार विजेत्या व नवीसांगवी जिल्हा क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, पूनम विशाल विधाते, राहुल बालवडकर, डॉ.सागर बालवडकर, मनोज बालवडकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र करंजखेले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे, सचिन भोसले यांच्यासह पदाधिकारी, पंच आदि मान्यवर उपस्थित होते.