बाणेर :
बाणेर स्मशानभूमी समोरील बाणेर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली असून तो त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रयत स्वाभिमानी संघटना प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी प्रशासनाला दिला आहे.
मागील अनेक महिने झाले बाणेर स्मशानभूमीच्या समोरून जो रोड बाणेर मुख्य रोड कडे व गावात जातो त्या ठिकाणी महापालिकेच्या हुशार पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण रोडवर पेवर ब्लॉक बसवले आहेत हे पेवर ब्लॉक्स आजच्या स्थितीला एका बाजूने डोंगर आणि दुसऱ्या बाजूने नदी अशी परिस्थिती झाली आहे. रस्त्यावरून ये जा करण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे परंतु महापालिका प्रशासनाला याबाबत कसलेही गांभीर्य दिसत नाही. म्हणूनच येत्या दोन दिवसात जर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही, तर रयत स्वाभिमानी संघटना या रस्त्यात बसून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी सांगितले.


More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…