बाणेर :
माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि बावधन येथील किरण दगडे पाटील यांची विभागीय स्तरावरील रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती(ZRUCC) मध्ये केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निवड केली आहे. रेल्वे डेप्युटी डायरेक्टर रजनी तेटे यांनी यांच्या सही चे नियुक्ती पत्र देण्यात आले. रेल्वे वापरकर्त्यांना चांगले प्रतिनिधित्व मिळावे आणि वापरकर्त्यांमध्ये सल्लामसलत करण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय स्तरांवर रेल्वे वापरकर्ता सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. या समितीच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने आणि आमचे मार्गदर्शक रावसाहेब दानवे पाटील यांनी आमच्यावर विश्वास ठेवत आमची निवड केली हि अभिमानाची आणि आनंदाची बाब असून रेल्वे वापरकर्ते सामान्य जनतेच्या समस्या मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न करत राहील : माजी नगरसेवक अमोल बालवडकर
सदर समिती खालील कार्य हेतू बनवण्यात आली आहे.
१.समिती ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या भागात सुविधांची तरतूद.
२.समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात नवीन स्थानके सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव.
३.वेळापत्रकांशी संबंधित व्यवस्था.
४. रेल्वेने पुरवल्या जाणाऱ्या प्रवासी सेवा आणि सुविधांमध्ये सुधारणा.
५.सामान्य जनतेच्या हित किंवा सार्वजनिक सोयीशी संबंधित कोणतीही बाब किंवा अशा सेवा आणि वापरकर्त्यांच्या वैशिष्ट्यांना प्रभावित करणारी कोणतीही बाब प्रतिनिधीत्व करण्याच्या अधीन, किंवा प्रादेशिक रेल्वे वापरकर्त्यांना त्यांच्याशी संबंधित असलेली बाब
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…