November 21, 2024

Samrajya Ladha

योगीराज पतसंस्था सामाजिक कार्यात व आर्थिक कार्यातही अग्रेसर…. मा.खासदार छत्रपती संभाजीराजे

बाणेर :

योगीराज पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा योगीराज भूषण पुरस्कार श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांना छत्रपती संभाजी राजे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी योगीराज पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा देखील आयोजित करण्यात आली होती. तसेच श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील मंदिरासाठी योगीराज पतसंस्थेने संकल्प केलेले एक कोटी रुपयांची रक्कम यावेळी सुपूर्त करण्यात आली.

योगीराज विशेष गौरव पुरस्कार वसुंधरा अभियान बाणेर आणि गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्था तसेच सहकार गौरव पुरस्कार बाणेर नागरी पतसंस्था मर्या. बाणेर आणि श्रीराम समर्थ सहकारी मर्या. बाणेर यांना प्रदान करण्यात आला.

एकीकडे सहकाराची परिस्थिती बिकट होत चालली असताना योगीराज पतसंस्थेने व्यवस्थित नियोजनबद्धपणे आपली वाटचाल यशस्वीरित्या सुरू ठेवली ही बाब अभिमानास्पद आहे. केवळ कर्ज आणि ठेवी एवढ्यावर न थांबता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जातात ही चांगली बाब योगीराज पतसंस्थेने जपली आहे.योगीराज पतसंस्था सामाजिक कार्यात व आर्थिक कार्यातही अग्रेसर आहे : छत्रपती संभाजी राजे

यावेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या कार्याचा वार्षिक आढावा यावेळी सांगताना संस्थेने यशस्वी पणे चालू ठेवलेली वाटचाल विशद केली. संस्थेची कामाची पद्धत आणि ठेवीदारांचा विश्वास यामुळे आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेची चारशे कोटींची उलाढाल असून दोन कोटी 74 लाख नफा संस्था मिळवत आहे. पतसंस्थेला सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी महापालिकेने जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे करत आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून भंडारा डोंगरावर उभ्या राहणाऱ्या मंदिरासाठी आज जरी 1 कोटी रुपयांची देणगी दिली असली तरी मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत देणगी देण्याचे काम चालू राहील.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पतसंस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. शिस्त पत्र रित्या पतसंस्था करत असलेले काम गौरवार्थ आहे. पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमाद्वारे नागरिकांची सेवा करते हे देखील उल्लेखनीय आहे. पतसंस्थेला सामाजिक उपक्रमासाठी हवी असणारी जागा सुचवा आम्ही ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, संस्थेने आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे अशीच प्रगती यापुढेही कायम राहील अशी आशा व्यक्त केली. भंडारा डोंगरा साठी केंद्रातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगितले.

यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिर साठी अकरा लाख रूपये योगीराज पतसंस्थेच्या मार्फत देणाऱ्या अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुरकुटे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर चे खजिनदार सायकर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील शेळके, मा. आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक विकास दांगट, देहू संस्थान चे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, उपनिबंधक निलम पिंगळे, उद्योजक विजय जगताप, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, धर्मवीर संभाजी बँकेचे अध्यक्ष बाबूराव शितोळे, इस्कॉनचे प्रभूजी, पुरंदर पंचायत समिती माजी सभापती रमेश जाधव, अशोक मुरकुटे, डॉ. दिलीप मुरकुटे, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सनी निम्हण, राहुल कोकाटे, राजेंद्र बांदल, राहुल बालवडकर, गणपत मुरकुटे, पुनम विधाते, गणपत बालवडकर, अनिकेत मुरकुटे, जीवन चाकणकर, भगवान पठारे, चांगदेव पिंगळे, बाळासाहेब बराटे तसेच भंडारा डोंगर ट्रस्ट चे विश्वस्त, वारकरी संप्रदायातील मान्यवर, संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.