August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे ज्योती गणेश कळमकर व इस्कॉन यांच्या सहकार्यामुळे आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न…

बाणेर :

बाणेर येथिल एमरोल्ड बँक्वेट हॉल मध्ये माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या माध्यमातून आणि इस्कॉन च्या सहकार्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी भजन, अभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, डान्स कॉम्पिटिशन, वेशभूषा, बुक शो, रोमांचक नाटिका अशा वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रम या सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहत सांस्कृतीक महोत्सवामध्ये मोठया उत्साहात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी रमेशजी बेंद्रू , मारुती नरके काका यांनी विशेष प्रयत्न केले. 

श्रीकृष्ण जन्माष्टमी सगळीकडे मोठया उत्साहात साजरी होत असते. या निमित्त हा सुंदर आणि आगळा वेगळा कार्यक्रम माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर यांच्या सहकार्यामुळे संपन्न झाला म्हणून उपस्थितांनी त्यांचे आभार मानले.