September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर गावचे भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांची भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस पदी निवड..

बाणेर :

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, बाणेर गावचे भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांची महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश पदाधिकारी म्हणून ओबीसी मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड होणे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असून येणाऱ्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन करणार आहे : प्रल्हाद सायकर(सरचिटणीस महाराष्ट्र)

भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाची पक्षाने दखल घेऊन प्रल्हाद सायकर यांना सरचिटणीस पदी नियुक्ती मिळाली आहे. सर्वसामान्यांशी मिळून मिसळून काम करण्याची पद्धत, उत्साह आणि पक्षाशी समर्पित वृत्ती मुळे त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

You may have missed