February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील श्री अष्टविनायक मित्र मंडळाने साकारली  श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती.. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना

बालेवाडी :

बालेवाडी येथील श्री अष्टविनायक मित्र मंडळ यांचे रोप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष असून मंडळानी ह्यावर्षी श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. डोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पुजा व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

मंडळाच्या वतीने दर वर्षी सामाजप्रभोदन व्याख्यान व आरोग्यविषयक उपक्रम राबवत जातात.तीच परंपरा कायम राखत मंडळाने बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी व रविवार दिनांक 24 सप्टेबंर 2023  रोजी श्री विदर्भ रत्न रामणाचार्य ह.भ.प.रामरावजी ढोक महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन ठेवलेले आहे.

मंडळाच्या वतीने भाविकांनी मंडळाने साकारलेली श्री केदारनाथ मंदिर प्रतिकृती पाहण्यास यावे. तसेच मंडळ राबवत असलेल्या उपक्रमात सहभागी व्हावे.