July 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील महिला बचत गटांनी पोलिसांना राखी बांधून केली रक्षाबंधन साजरा

बाणेर :

बालेवाडी येथील पोलीस चौकीत बाणेर गावाच्या महिला बचत गटांतील महिलांनी पोलीस नाईक आणि सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षण करण्याचे वचन बहिणींनी भावाकडून घेतले आहे.

बाणेर येथील अहिल्या महिला बचत गट आणि सावित्री महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी बालेवाडी येथील पोलीस नाईक रवींद्र दहातोंडे, पोलीस शिपाई महेंद्र वाईकर, सूरज खाडे, सचिन होगे यांना राखी बांधून राक्षबंधन सण साजरा केला.

तर अहिल्या आणि सावित्री महिला बचत गटाच्या अश्विनी मोरे, बबीता कांबळे, इंदू कांबळे ,शायद पठाण ,वैशाली कांबळे ,अनिता शिंदे, पार्वती सूर्यवंशी, प्रियंका कांबळे, अनिता सूर्यवंशी, रेखा मातंग,शायदा पठाण आदी महिला उपस्थित होत्या.