November 22, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील विना परवाना खोदाई प्रकरणी पुणे मनपाच्या पथ विभागाचे मुख्य अभियंतास गांभीर्यच नाही – रविराज काळे

पुणे :

बालेवाडी येथील सर्वे नं 45 या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक यांनी कस्तुरी स्पेसेस या बांधकाम प्रकल्पासाठी विद्युत केबल टाकण्यासाठी विनापरवाना रस्ते खोदाई केली. ही खोदाई 27/07/2023 रोजी केली ती खोदाई 560 मी खोदाई केली परंतु पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांना असा स्वप्नदोष झाला की बांधकाम व्यावसायिकास खुलासा नोटीस पाठवली तेव्हा फक्त 105 मी. चा उल्लेख केला. पुणे मनपाच्या मार्फत विकसित केलेल्या रस्त्यांची खोदाई करून विनापरवाना विद्युत केबल टाकणेची बाब गंभीर आहे. याचेच भान पुणे मनपा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना राहिले नाही असे दिसते, असा आरोप रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांनी केला.

रविराज काळे यांनी असेही सांगितले की, गेली एक महिना आम्ही रयत स्वाभिमानी संघटना शोधत होतो की ही विद्युत केबल टाकण्यासाठी कोणत्या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना खोदाई केली. ते आम्हाला समजताच आम्ही रयत स्वाभिमानी संघटनेने तक्रार केली परंतु पुणे मनपा पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांना वेळोवेळी फोनद्वारे विचारणा केली की 560 मी खोदाई असताना 105 मी चाच खुलासा का मागितला गेला ? परंतु त्यांचेकडून फक्त उत्तर यायचे उप अभियंता मकरंद वाडेकर यांना सांगतो. कुलकर्णी यांचेकडून या बांधकाम व्यावसायिकास का पाठिशी घातले जात आहे. याची चौकशी व्हायला हवी. मनपा अधिकारी व व्यावसायिक यांच्यात काही आर्थिक हितसंबंध दडले आहेत का हे देखील तपासले गेले पाहिजे. आज एक महिना उलटून गेला आहे. ना व्यावसायिकाने खुलासा केला आहे ना पुणे मनपाने 560 मी चा दंड आकारला आहे.

लवकरच पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व आयुक्त विक्रम कुमार यांची वेळ घेऊन झालेला सर्व प्रकार त्यांना सांगणार आहे. या सर्व प्रकरणाची जबाबदारी म्हणून पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी देखील करणार आहे असे रविराज काळे यांनी सांगितले.