बालेवाडी :
बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने त्यामध्ये भरलेल्या पाण्याच्या टँकरचे चाक फसले गेल्याने टँकरमधील हजारो लिटर पाणी रस्त्यावर सोडून टँकर मोकळा करावा लागला. त्यामूळे पाणी वाया गेलेच पण एवढा मोठा खड्डा असुन देखील प्रशासन त्याची दखल घेत नाही त्यामूळे नागरीकांना नाहक त्रास होत आहे.
बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहतूक कोलंबी जाते व नागरिकांना वाहतूक करताना मोठ्या कसरती सामोरे जावे लागत आहे. टँकर खड्ड्यात फसल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर सोडून द्यावे लागले. फार मोठी वाहतूक वर्दळ या रस्त्यावर आहे. महापालिकेने त्वरित हा रस्ता दुरुस्त करायला हवा तसेच इतर ठिकाणी देखिल रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत : रमेश रोकडे( बालेवाडी वेल्फेअर असोसिएशन)
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…