November 21, 2024

Samrajya Ladha

पुण्येश्वर मंदिराजवळील अनधिकृत मस्जिदीचे बांधकाम ४८ तासांत हटवा : आमदार महेश लांडगे

पुणे :

श्री पुण्येश्वर मंदिर परिसरात अतिक्रमणे हटवावीत, परिसरात काम बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सुरु असलेली अनधिकृत बांधकामे थांबवावीत, अशा विविध मागण्यांसंदर्भात आज पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीनं पुणे महापालिकेसमोर निदर्शने केली. या मागण्यांवर तातडीने कारवाई केली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशार देत आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले.

आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे अनुयायी आहोत. आम्ही अयोध्येतील बाबरी मशीद पाडू शकतो. तर पुण्येश्वरला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी तिथे उभारलेली अनधिकृत मशीद पाडूच शकतो, अशी भीमगर्जना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पुणे हे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील बेकायदा मस्जिद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर आज तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे, नितेश राणे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, पुण्यात श्री. पुण्येश्वर मंदिराजवळील अनधिकृत मस्जिदीचे बांधकाम ४८ तासांत हटवा. अन्यथा आम्ही हटवणार आहोत. पुणे शहराला ज्या मंदिराच्या नावावरुन ओळखले जाते. तो इतिहास कायम ठेवण्यासाठी आम्ही आता लढा सुरू केला आहे. पुण्येश्वराला अतिक्रमणातून मुक्त केले पाहिजे. न्यायालयाने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. पण, प्रशासन कारवाई करीत नाही. प्रशासनाने जी मुळमुळीत भूमिका घेतली आहे.