पुणे :
समाविष्ट 32 गावांमधील 408 कर्मचाऱ्यांना याअगोदरच महापालिकेच्या सेवेत समाषिष्ट करून घेण्यात आले आहे. यापैकी आठ गावांच्या कर्मचाऱ्यांना महापालिका वेतन श्रेणी लागू करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
महापालिकेच्या हद्दीमध्ये गावांचा समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांना 2021 मध्ये महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करून घेण्यात आली होती. मात्र, त्यांना ग्रामपंचायतीमध्ये मानधन देण्यात येत होते. लेखापरीक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर सध्या आठ गावांमधील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनामधील फरकही दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या सेवेत या कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते. मात्र त्यांना वेतन महापालिकेच्या नियमानुसार मिळत नव्हते. त्यामुळे आता सुधारित वेतनश्रेणी आठ गावांतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली असून एका महिन्यामध्ये त्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
More Stories
माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा उमेदवार…
क्रेडाई महाराष्ट्राचे प्रथमच व्हिएतनाम येथे आंतराराष्ट्रीय अधिवेशन संपन्न…
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; आपची मागणी