November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील सावित्री महिला बचत गटाने राबविले आरोग्य शिबिर..

बाणेर :

पुणे जिल्ह्यातील बाणेर या गावात नाईक नवरे कॅम्प येथे सावित्री महिला बचत गटाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत हे शिबिर चालु होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावित्री महिला बचत गटांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून केले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या पूनम विधाते उपस्थित होत्या.

सदरील शिबिर लहान मुलांसाठी ठेवण्यात होते. यात वयोगट 8 ते 16 वर्षासाठी होते. तर सध्या लहान मुलांमध्ये डोळे येण्याचे लक्षणे आढळून येत असल्याने त्यावर विशेष तपासणी करण्यात आले. तसेच जनरल हेल्थ तपासणी केली असून सुमारे 37 मुलांचे तपासणी करण्यात आले.

यावेळी सावित्री महिला बचत गटातील अध्यक्षा मनिषा पुजारी, उपाध्यक्ष कोमल लोणकर, वर्षा हंबीरराव, सविता जगताप, शायद पठाण, मीना भांडवलकर नेहा साळवे, वैशाली कांबळे, मनीषा शिंदे उपस्थित होत्या. अहिल्या महिला बचत गटाचे अध्यक्षा साजना जाधव आदी महिला सदस्य उपस्थित होत्या.

सिंबायोसिस मेडिकल कॉलेज आणि सिंबायोसिस हॉस्पिटल, लवळे, मुळशी, पुणे येथील कम्युनिटी मेडीसिन विभागप्रमुख डॉ. रेश्मा पाटील यांच्या सहकार्याने डॉ. सौरभ मुलाणी, बालरोग विभाग,आणि मेडिकल सामाजिक कार्यकर्ते आरती थोरवे, प्रीती नरवाडे, महादेव सोनावणे यांनी आरोग्य तपासणी केली आहे.