September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राजाभाऊ गुडदे फाउंडेशन तर्फे ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवा निमित्ताने “प्रेरणा” उपक्रम जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा, घोटावडे येथे संपन्न.

घोटावडे :

७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवा निमित्ताने, राजाभाऊ गुडदे फाउंडेशन, बालेवाडी, पुणे तर्फे ‘प्रेरणा’ उपक्रम जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा, घोटावडे ता. मुळशी येथे राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीच्या शालेय विद्यार्थ्यांनसाठी १५० शालेय बॅगस, आवश्यक शैक्षणिक साहित्य, कॅडबरी चाॅकलेटस व स्नॅक्स वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. अलका रामदास गवारे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन मनोरंजक व ज्ञान प्रबोधक प्रश्न मंजुषा घेण्यात आली व प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली.

ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शालेय साहित्य कॅडबरी चॉकलेट स्नॅक्स मिळाला की त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळ्या प्रकारचा आनंद पहावयास मिळतो. त्यांना या वस्तूंचे फार अप्रूप वाटते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा ऊमलाव्यात म्हणूनच ‘प्रेरणा’ उपक्रम राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या मार्फत राबविला : सौ.किरण गुडदे(अध्यक्षा राजाभाऊ गुडदे फाउंडेशन)

यावेळी मुख्याध्यापिका डोंगरे मॅडम, राजाभाऊ गुडदे फाउंडेशन चे उत्साही कार्यकर्ते सर्वश्री पराग केळकर, संतोष बंग, अमोल इंगोले, मनोज जोशी, अविनाश जोशी, अमोल बगाडिया, सोनल बगाडिया, नीता मसाने, डॉ. अभय गुंजाळ, अनिमेश गुडदे, विनोद भुजाडे, पंकज बोराळे, योगेश महाजन, पंकज इंगोले, अभिजीत कुटे, अक्षय मालूसरे, गणेश खडसान, शरद मगर, योगेश मैनकर, सदानंद भिडे, दीपक तिडके, वैशाली शितोळे, एकता पंजवानी, जितेंद्र भल्ला, राहुल सदावर्ते, आत्मज वाकडे, निषाद गुडदे, सुमित खैरनार, अभिषेक कुमार, वसीम नदाफ, संगीत गुडदे यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. किरण गुडदे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
पावसाच्या दिवसांत त्या दिवशी पाऊस न आल्याने शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांबरोबर ध्वजारोहण आनंदात पार पडले. कार्यक्रमात शालेय शिक्षकांचीही मदत झाली आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

You may have missed