March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

हभप विश्वास कळमकर व विद्या बेंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू युवा प्रबोधिनी व सुरानंद फाउंडेशन ‘यांच्या संयुक्त विद्यमाने आंदर मावळ येथील परिसरात गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप..

मावळ :

ह.भ.प. विश्वास नंदकुमार कळमकर आणि विद्या राजेंद्र बेंद्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन हिंदू युवा प्रबोधिनी व सुरानंद फाउंडेशन ‘यांच्या संयुक्त विद्यमाने आंदर मावळ येथील किवळे, अनसुटे, परिठेवाडी या दुर्गम भागातील गरजु विद्यार्थ्यांना रेनकोट, दप्तरे आणि शालेय साहित्याचे वितरण आज करण्यात आले.

समाजात वावरताना समाजाप्रती आपले काही देणे लागते या हेतूने गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचा वाटप करून वाढदिवस साजरा करत गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद म्हणजे वाढदिवस सत्कारणी लागल्याचे समाधान प्राप्त होते – ह. भ. प. विश्वास कळमकर

यावेळी गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, इतिहास संशोधक अशोक सरपाटील, पोलिस पाटील पै. किरण शेळके, नितिन चव्हाण-पाटील, राष्ट्रीय खेळाडू हनुमंतराव जांभुळकर, शिवव्याख्याते विनायकराव दारवटकर, राष्ट्रीय खेळाडू गणेश जाधव, युवाउद्योजक सचिन ढोरे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अक्षयराव भेगडे, कु. शुभम चांदेरे ,कु.रजत कळमकर ,कु.स्वराज निकते यांसह कुटुंबातील इतर सन्माननिय सदस्य उपस्थित होते. सदर उपक्रमाचे संयोजन प्रा. छायाताई गणेशभाऊ जाधव यांनी केले होते.