November 22, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

बाणेर :

बाणेर येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रमुख पाहुणे रीजनल सोसायटी फॉर एज्युकेशन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ आधी टेक चे फाउंडर डायरेक्टर तसेच फाउंडर प्रेसिडेंट रिसर्च डॉ. देवेंद्र लिंगोजवार व ॲड. दिलीप शेलार यांची उपस्थिती लाभली.

स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी संस्थेचे संस्थापक माननीय शिवलाल धनकुडे, सेक्रेटरी विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे, अध्यक्ष सुरेखा धनकुडे, सीईओ सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे, कोमल शिंदे हे सर्वजण उपस्थित होते तसेच प्रणाली धनकुडे, कोमल धनकुडे, काळुराम सायकर, हनुमंत मुरकुटे इत्यादींनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर देवेंद्र लिंगोजवार आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध कार्यक्रम सादर केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी डॉक्टर लिंगोजवार यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी शिवाजी महाराजांपासून जो संघर्ष सुरू झाला त्याची पूर्ण माहिती दिली तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतात प्रथमतः आले त्यावेळेस व्यापार पासून सुरुवात केली आणि नंतर भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली आणि संघर्ष करत दीडशे वर्षाची गुलामगिरी पासून मुक्तता मिळवत स्वातंत्र्य मिळवले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांच्यावर विशेष काम करणे आणि त्यांना आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त केले पाहिजे याविषयी विशेष मार्गदर्शन केले

तसेच ॲड. दिलीप शेलार यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे खडतर प्रयत्न करण्यात आले त्याविषयी विशेष मार्गदर्शन केले संस्थेचे खजिनदार राहुल धनकुडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे देखील आभार मानले.